पिंपरी I झुंज न्यूज : निगडी येथील झुंज दिव्यांग संस्था व एकता मित्र मंडळ निगडी यांच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी पंढरपूर व अक्कलकोट अशी मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये परिसरातील 130 दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला.
दिनांक 14/5/2022 रोजी घरकुल चिखली या ठिकाणाहून सकाळी सात वाजता या सहलीची सुरुवात झाली.आणि 15/5/2022 रोजी सकाळी नऊ वाजता अक्कलकोट पंढरपूर वरून परत घरकुल चिखली या ठिकाणी आगमन झाले.
यावेळी दिव्यांग बांधवांनी सहलीचा पुरेपूर फायदा उचलला. दिव्यांग असल्यामुळे सहजासहजी कुठे जायला मिळत नाही परंतु झुंज दिव्यांग संस्था व एकता मित्र मंडळाने दिव्यांग बांधवांना पंढरपूर व अक्कलकोट येथे थेट दर्शन दिले. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तसेच सहलीमध्ये जाताना – येताना सर्व दिव्यांग बांधव या सहली मध्ये आनंदाने गाणे गाऊन नाचून मजा घेत होते.
झुंज दिव्यांगा संस्था व एकता मित्र मंडळ यांचे दिव्यांग बांधवांना घेऊन सहल काढण्याचे हे दुसरे वर्ष आहे. चहा नाश्ता जेवण सर्व काही प्रवासात मोफत दिले जाते यासाठी सकाळी नाष्टा कु श्रेयस जितेंद्र बेदमुथा, सकाळी चहा उद्योगपती शुभम शेटिया हॉटेल हिंदवी चौफुला, दुपारी पंढरपूर येथील जेवण संपूर्ण सोय श्री बालाजी जामदार, वाहन व्यवस्था राहुल येवले व गणेश बाफना यांनी केली.
पुणे, पंढरपूर, अक्ककोट व पुन्हा पुणे असे नियोजन करणाऱ्या सर्वांचे दिव्यांग बांधवांनी आभार मानले, सहल यशस्वी होण्यासाठी झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजु हिरवे व त्यांचे सर्व पदाधिकारी गेली दोन महिने परीश्रम घेत होते.