खेड I झुंज न्यूज : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या दावडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री भैरवनाथ शेतकरी सहकारी विकास पॅनेलने 12 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले. तर श्री महालक्ष्मी शेतकरी पॅनेलला एकही जागा जिंकता न आल्याने त्यांच्यावर पराभवाची नामुष्कीओढवली. यामध्ये 13 जागांपैकी जीवन किसन शिंदे यांची बिनविरोध निवड झाली होती.
उर्वरित बारा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे-साहेबराव दुंडे, रामदास बोत्रे, गणेष गव्हाणे, संतोश गावडे, प्रकाश शिंदे, संपत लोणकर, संदीप गाडगे, बाळासाहेब वाघिरे, सुनीता मांजरे, विमल होरे, मल्हारी तरटे आणि भगवान ओव्हाळ, भैरवनाथ पॅनेलने सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत कपबशी चिन्ह घेऊन सोसायटीवर वर्चस्व राखले असून, पॅनेलप्रमुख साहेबराव दुंडे यांनी तीनही निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवली आहेत.
पॅनेल विजयी होण्यासाठी तुकाराम गाडगे, संतोष गव्हाणे, भाऊसाहेब होरे, सचिन नवले, संभाजी घारे, सोमा शिंदे, पांडुरंग दुंडे, दत्तात्रेय मांजरे, संभाजी डुंबरे, राहुल कदम, बाबाजी गाडगे व बाळासाहेब दुंडे यांनी प्रयत्न केले. सहायक निबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी हरिशचंद्र कांबळे, जे. बी. मुलाणी, संपतराव मलघे व रमेश पाचारणे यांनी निवडणूक कामकाज पाहिले.