पुणे I झुंज न्यूज : प्रदिप टोंनगे दिग्दर्शीत मराठी चित्रपट तिरसाट एक प्रेम कथेवर अधारित आसुन या चित्रपटाची गाणी रसिक प्रेषकानां तालावर तिरकवणारी आहे .
या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता निरज पवार आणि सिनेअभिनेत्री तेजस्वीनी शिर्के आहे . हा चित्रपट 20 मे रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असुन तो सर्वांनी चित्रपटगृहातच जाऊन पहावा यासाठी चित्रपटाचे पोस्टर प्रसारित करत प्रोमोशन करण्यात आले.
मनसे चित्रपट सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने संपूर्ण टिमचे अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चित्रपट सेनेचे शहरध्यक्ष दत्ता घुले, शिवनाथ दिलपाक, सुरज लोणकर, प्रनव आसरे, वैजनाथ डोपरे आदी उपस्थीत होते.