पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील APH स्टुडिओच्या डायरेक्टर, अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांची एस.एम.ई चेंबर ऑफ इंडिया या उद्योग-व्यवसायातील नामांकित संस्थेच्या “ब्रँड अँबेसिडर” पदी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके यांनी प्रज्ञा पाटील यांची निवड केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना व जनहित कक्षाच्या वतीने पिंपरीतील मध्यवर्ती कार्यालयात अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांची “ब्रँड अँबेसिडर” पदी निवड झाल्याबद्दल जनहित कक्षाचे शहराध्यक्ष राजू भालेराव, उपशहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, उपविभाग अध्यक्ष शिशिर महाबळेश्वरकर, शाखा अध्यक्ष हनिफ शेख, जितेश वाल्हेकर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मनसे चित्रपट सेनेचे दिपक भालेराव, मनसे चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष दत्ता घुले, शहर उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, प्रसाद खैरे, सुधीर भालेराव, अक्षय थोरात, रोहन पवार, विशाल माझिरे, उपस्थित होते.
“अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध असलेल्या अनुसाया प्रोडक्शन हाऊस (APH स्टुडिओ) च्या माध्यमातून कला कौशल्याच्या जोरावर कला-अभिनय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कार्याची एक नवी ओळख पिंपरी चिंचवड शहरात निर्माण केली आहे. त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, अल्बम्स यांची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पोस्ट प्रोडक्शन केलेल्या वर्किंग वुमन वर आधारित असलेल्या “भावना” या शॉर्ट फिल्मला “बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म” म्हणून राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देखील मिळाला आहे. प्रज्ञा पाटील यांचा “केकताड” हा बहुप्रतिक्षीत असलेला चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.