दापोडी I झुंज न्यूज : दापोडी मंदिल त्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी. दापोडी मध्ये राष्ट्रीय फेरीवाले धोरणांतरगत हाॅकर्स झोन पुर्णस्थापित करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भाजी विक्री व फळ विक्री असा किरकोळ व्यवसाय करू पाहणा-याच्या नागरिकांना योग्य ती जागा व स्टाॅल देऊन दापोडीतील नागरिकांना उदरनिर्वाह साठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेना च्या सुषमा अजित शेलार (शहर अध्यक्ष- भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर ) यांनी “ह प्रभाग” मधील वरिष्ठ अधिकारी विजय थोरात याना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हणले आहे कि, दापोडी तील भाजी विक्री व फळ विक्री करू पाहणारे फेरीवाले व हातगाडीवाले नागरिक हे रस्त्यावरील अतिक्रमण मुळे आर्थिकदृष्ट्या सतत अडचणीत सापडले जातात, रस्त्यावर व फुटपाथ वर हातगाडी लावून व्यवसाय करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. परंतु जे शिक्षणाने वंचित आहेत व ज्याना शिक्षण घेऊन देखिल कुठे ही नोकरी भेटली नाही असे नागरिक रस्त्यावर उतरून आपल्या उदरनिर्वाह साठी भाजी विक्री व फळ विक्री करू लागले.
“आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्या कारणाने ते स्वतःची जागा घेऊन किंवा भाड्याने जागा घेऊन व्यवसाय करू शकत नाहीत. या कारणास्तव जेमतेम पैसे गोळा करून ते हातगाडी नागरिकांनी व्यवसाय सुरू केला. जेमतेम 4 – 5 रूपयांची मारजिंग ठेऊन ते त्या भाजी विक्री मागे व फळ विक्री मागे नफा मिळवतात. परंतु महानगरपालिके कडून सतत भाजी विक्री व फळ विक्री करणारे फेरीवाले व हातगाडीवाले नागरिकांच्या महिन्यातून 3, 4 वेळा तर हातगाडया उचल्या जातात. प्रत्येक वेळी दंड वसूल केला जातो. कमवायचं किती न त्या मागे कीती गमवल जात याचा काही ताळमेळच राहिला नाही.
तरी या सर्व गोष्टींचा विचार करून नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा हंसी अपेक्षा सुषमा शेलार यांनी व्यक्त केली आहे. तुमच्या मागणीस त्वरित “ह प्रभाग संमिती” मार्फत विचार करून तुमची मागणी पुर्ण करू, असा शब्द यावेळी वरिष्ठ अधिकारी विजय थोरात यांनी दिला.