पुणे I झुंज न्यूज : राष्ट्रीय शाह शक्ती संघटन आणि वनविभाग तळजाई पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तळजाई टेकडी वर पर्यावरणा संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. जांभूळ, कदंब, चंदन, गुलार निलगिरी इत्यादी आरोग्यवर्धक जंगली वृक्षांची लागवड या वेळी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय शाह शक्ती संघटन चे राष्ट्रीय महासचिव अक्षय गादिया, महाराष्ट्र उपाध्यक्ष तुषार मोहंता, महाराष्ट्र अध्यक्ष जयंत जगताप, महाराष्ट्र महीला अध्यक्षा राहेल शेकतकर, पुणे महीला अध्यक्षा रेला केन यांची उपस्थिती होती.
उपवनसंरक्षक पुणे राहूल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाल, वनरक्षक माधव चौहान यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
हा संपुर्ण प्रकल्प राष्ट्रीय अध्यक्ष राहूल मोदी, राष्ट्रीय महासचिव अक्षय गादिया, राज्य अध्यक्ष जयंत जगताप आणि राज्य उपाध्यक्ष तुषार मोहंता यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.