पुणे | झुंज न्यूज : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हृदयविकाराच्या धक्क्यानं त्याचं निधन झालं. 30 जानेवारीला रमेश देव यांचा वाढदिवस झाला होता.
अभिनेते अशोक सराफ रमेश देव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्यासोबत अशोक सराफ यांचं फोनवरुन बोलणं झालं होतं. मराठीसोबत हिंदी सिनेमातही अनेक महत्त्वाच्या भूमिका रमेश देव यांनी वढवल्या होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता.
एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या निधनानं एक पोकळी निर्माण झाली असल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांसह दिग्गजांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण आयुष्य अभिनयासाठी अर्पण
चित्रपटसृष्टीमध्ये असे काही अभिनेते (Actor) असतात ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चित्रपट या एकाच गोष्टीसाठी दिलेलं असंत. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे त्यापैकीच एक होते. त्यांनी आपली पूर्ण हयात सिनेमा आणि अभिनयाला समर्पित केली होती. 30 जानेवारील 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला 93वा वाढदिवस साजरा केला होता.
रमेश देव (Ramesh Deo) यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी 1962 मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीम देव) (Seema Deo) यांच्यासोबत लग्न केलं होतं. या वर्षी रमेश देव आणि सीमा देव हे कपल आपल्या लग्नाचे 59 वर्षे पूर्ण करणार होतं.
मात्र रमेश देव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांसन मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती.