पुणे I झुंज न्यूज : आदर्श गाव फदालेवाडी – उगलेवाडी गावात आदर्श गाव, निर्मळ ग्राम, तंटामुक्त अभियान यात गावाला पुरस्कार मिळाले आहेत. आता केंद्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात भाग घेऊन गावात साफ सफाई, स्वच्छता, लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
सायकल रॅली, महिला बचत गटाचा हळदी – कुंकू घेण्यात आला. गावात माझी वसुंधरा अभियानाची भिंतीवर चित्रे काढण्यात आली. आदर्श गावाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविणे बाबत शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सीता किर्वे पुणे, मा. काळे साहेब आदर्श गाव महाराष्ट्र राज्य मंडळ,गावच्या सरपंच मीना उगले, उपसरंचप शंकर शिंगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनाबाई उगले, बजरंग उगले, ग्रामसेविका रूपाली देवडे, माजी सरपंच शांताबाई उगले, रामचंद्र भोजने, रामचंद्र उगले, किसन भोजने, तालुका समन्वयक लता केंगले व उगलेवाडी – बोऱ्हाडेवाडी – फदालेवाडी ग्रामस्थ व महिला बचत गट सहभागी झाले होते.