थेरगाव I झुंज न्यूज : थेरगाव परिसरातील संत ज्ञानेश्वर कॉलनीमधील रहिवासी अशोक कावळे यांचे महावितरण विभागाने तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी समाजसेवक युनूस पठाण पुन्हा मदतीला धावले आणि त्या कुटुंबाला अंधकारातून नेले प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी सहकार्य केले.
नेमकी काय होती घटना ?
प्रभाग क्रमांक 23 धनगर बाबा मंदिर च्या मागे संत ज्ञानेश्वर कॉलनी कॉलनीमधील रहिवासी अशोक कावळे यांचा युनूस पठाण यांना फोन आला की भाऊ आम्ही थोडे अडचणीमध्ये आहोत आपल्या मदतीची आम्हाला खूप गरज आहे. असा फोन येताच पठाण यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्या ठिकाणी त्यांच्या मदतीस पोहोचले.
घडलेला सर्व प्रकार ऐकून घेतला. कावळे हे गेल्या सहा वर्षापासून त्यांच्या कुटुंबियासह वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे अडचणीत होते. ६ वर्षांपूर्वी त्यांच्या घरी वीज मीटर असता त्यांना ५९०० रु इतके बिल आले होते. परंतु त्यांची परिस्थिती अत्यंत नाजुक असल्याकारणाने ते सदर बिल भरू शकले नव्हते म्हणून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
सध्या ते राहत असलेल्या ठिकाणी भाड्याचेही पैसे भरू शकत नसल्या कारणाने सदर विजधारकांनी त्यांचं वीज कनेक्शन कट केले होते. या सर्व गोष्टी युनुस पठाण यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर कुटुंबाचे कागदपत्र घेऊन जवळील वीज कनेक्शन विभागांमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी भेटून विषयावर चर्चा केली व काही दिवसातच सदर कुटुंबाला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन गेले.
“खंडित वीज पुरवठा असताना देखील सदर अधिकाऱ्याशी विनंतीपूर्वक बोलून वीज पुरवठा सुरळीत करून दिल्याबद्दल सदर कुटुंबाने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. सदर कुटुंबाच्या प्रश्न संबंधित नाही तर, कुठल्याही सामाजिक समस्ये संबंधी असो किंवा नागरिकांच्या कुठल्याही प्रश्नासंदर्भात सदैव सेवेस तत्पर हजर असणारे समाजसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य युनूस पठाण यांचे कौतुक होत आहे.