पिंपरी I झुंज न्यूज : सरस्वती सोसायटी, मोरवाडी मधील योगेश कांबळे या वाचनवेड्या तरुणाने अनोखा उपक्रम राबविला असून त्यांनी आपला वयक्तिक असलेला ४८० पुस्तकांचा संग्रह सोसायटीतील लोकांसाठी वाचनासाठी सार्वजनिक केला आहे.
पुस्तक संग्रहाचे मिनी लायब्ररी मध्ये रूपांतर केल्याने त्यांचे कौतुक होत आहेत. १०८ घरांची हि सोसायटी आहे. सोसायटीधारकांनी पुस्तक वाचुन परत करणे व दुसरे घेऊन जाणे या तत्वावर हा उपक्रम सुरू केला. विशेष म्हणजे हे कसलेही डिपॉझिट किंवा कसली फी आकारली नसून अगदी मोफत व निःशुल्क उपक्रम राबविला आहे.
या मिनी लायब्ररीचे उद्घाटन सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक श्री. नार्वेकर काका यांच्या हस्ते करत पहिले पुस्तक म्हणुन भगवद्गीता ही अमोल चौगुले यांना देऊन सुरुवात करण्यात आली.
“समाजाला वाचणाची सवय लागावी तसेच पुस्तकाचे आणि वाचणाचे महत्त्व कळावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. वाचण हे एक प्रकारचे ध्यान साधनाच असते. तरुण मुलांनी मोबाईल हातात न घेता पुस्तक हातात घेतले पाहिजे तरच त्यांच्या हातात ऊद्याचे चांगले भविष्य असेल. आणि असा उपक्रम जर प्रत्येक सोसायटी मध्ये राबवला तर सामाजिक प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. पण त्यासाठी गरज आहे ती योगेश कांबळे यांच्या सारख्या वाचणवेड्याची.