पिंपरी I झुंज न्यूज : आमदार अण्णा बनसोडे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून नुकताच प्रभाग क्रमांक 15 निगडी प्राधिकरण येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. निगडी प्राधिकरण भागातील नागरिकांकडून आमदार बनसोडे यांच्या कडे पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे, रस्ता काँक्रीटीकरण हौसिंग सोसायट्यांचे अद्यावत करणे इत्यादी कामे करून देण्याबाबत मागणी करण्यात येत होती. त्यांच्या मागण्यांची दखल घेत आमदार बनसोडे यांनी विविध विकासकामासाठी 1 कोटी 10 लाखाचा आमदार निधी मंजूर करून आणला.
निगडी प्राधिकरण मधील सुखवानी प्लाझा,मनीषा अपार्टमेंट, शितछाया सोसायटी, प्रबोधन सोसायटी, शुभम पार्क,गणेश मंदिर गणेश बाग, त्रिमूर्ती सोसायटी व परमार पार्क या सर्व सोसायटी व धार्मिक स्थळी पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे, रस्ता काँक्रीटीकरण करणे यासारख्या विविध विकास कामासाठी 1 कोटी 10 लाखाचा आमदार निधी मंजूर करून आणण्यात आला. तसेच तक्षशिला बुद्ध विहार व नालंदा बुद्ध विहार यांना विशेष निधी म्हणून प्रत्येकी एक कोटी मंजूर करण्यात आले आहेत व त्यातून तेथील विकास कामे पार पाडण्यात येणार आहेत.या सर्व विकासकामांचे भूमिपूजन काल आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
संवेदनशील व जनतेची आवश्यक आणि गरजे ची कामे तातडीने पूर्ण करणारा नेता म्हणजे आमदार अण्णा बनसोडे अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली .
या वेळी बोलतांना आमदार बनसोडे म्हणाले की , यापुढे देखील लोकांच्या मागण्या लक्षात घेऊन जेवढे शक्य होईल त्या सर्व सोसायट्याचे अद्यावतीकरणाचे काम पुढील काळात देखील सुरू राहील.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मा उपमहापौर व विद्यमान नगरसेविका शैलजा ताई मोरे, राजू गावडे, तक्षशिला बुद्ध विहाराचे प्रताप सोनवणे, नालंदा बुद्ध विहाराचे ओव्हाळ सर, माजी महापौर आर एस कुमार, निलेश शिंदे, सिध्दार्थ बनसोडे, सतीश लांडगे, पल्लवी पांढरे व सर्व सोसायट्याचे पदाधिकारी व प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक उपस्थित होते.