पिंपरी | झुंज न्यूज : महिला पत्रकारांची सोशल मीडियाद्वारे बदनामी करणारे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सदस्य अनिल भालेराव यांचे संघातून कायमस्वरूपी निलंबन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदस्य अनिल भालेराव यांनी सोशल मीडियावर पत्रकार व महिला पत्रकार यांची जाहीर बदनामी केल्याने पत्रकार संघाची बदनामी होत असल्याचे अनेक पत्रकार सदस्यांनी बोलताना मत व्यक्त केले.
अनिल भालेराव यांचे वर्तन गैर असून अशोभनीय आहे. त्यामुळे त्यांची कायमस्वरूपी संघातून निलंबन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या बैठकीस पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, जिल्हा प्रतिनिधी दादा आढाव, सदस्य बाबू कांबळे, सहचिटणीस माधुरी कोराड, पिंपरी चिंचवड सोशल मीडिया परिषदेचे अध्यक्ष सूरज साळवे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.