पिंपरी | झुंज न्यूज : पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढल्यानंतर रुग्णालय प्रशासन सर्तक झाले आहे. याबाबत पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे येणारी बैठक घेत, ओमिक्रॉनबाबतच्या घेत असलेल्या खबरदारीची माहिती घेतली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार ओमायक्रोनच्या उपाययोजना सुरूच होत्या. त्याप्रमाणे परदेशातून आलेल्या नागरिकांचे ट्रेसिंग सुरूच आहे.
सद्यस्थितीला ओमिक्रॉनचे लागण झालेल्या ६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील नव्याने बांधण्यात आलेलया वीर जिजामाता रुग्णालायात या रुग्णांवर उपाचार सुरु असल्याची माहिती महापौर ढोरे यांनी दिली.
याबरोबरच या व्यतिरिक्त इतर 86 परदेशी व्यक्तींचे आपण सॅम्पल घेतले त्यातले सात कोरोना पॉझिटिव्ह (ओमायक्रोन नव्हे) आलेले आहेत.पंधरा जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे.
ओमिक्रॉन आटोक्यात आणायचा तर नियम पाळा
दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने आपण निर्बंध हटवले होते. कोरोनाच्या नियमनामध्येही शिथिलता आणली होते . मात्र , नव्याने आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा नियम कडक करण्यात येत आहेत.
ओमिक्रॉनला आटोक्यात आणायचे असेल तर नियमांचं तंतोतंत पालन करायला हवे. शहरवासीय प्रशासनाला यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ओमिक्रॉन रुग्णांवर असा होतोय उपचार
शहरात आढळलेल्या सहा ओमिक्रॉन रुग्णांची स्थिर आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेत जी उपचार पद्धती होती, तीच उपचार पद्धती या रुग्णांवर अवलंबली गेली आहे. यामधील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या लहान मुलांना देखील कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या औषधोपचाराची गरज पडलेली नाही. अशी माहिती महापालिकेच्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
लस घेतल्यामुळं संसर्ग कमी
संसर्ग झालेल्या रुग्णांनी लसीचे डोस घेतल्याचा सकारात्मक परिणाम ही दिसून आलेत. लस घेतलेली असल्यामुळं पॉझिटिव्ह रुग्णांकडून फारसा प्रसार झालेला नाही. अशी माहिती जिजामाता रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितली आहे.