पिंपरी I झुंज न्यूज : भारताच्या उद्योजकांमध्ये ज्यांचे नाव घेतले जाते. ज्यांना महाराष्टाचे व पुणे ,पिंपरी चिंचवड शहराचे ज्यांना धीरुभाई अंबानी संबोधले जाते असे हसरं व प्रसन्न व्यक्तिमत्व कोहीनुर ग्रुप, पुणे चे चेअरमन व नक्षञाचं देणं काव्यमंचचे कार्याध्यक्ष सुप्रसिदध उद्योजक कृष्णकुमार गोयल साहेब यांचा वाढदिवस चैतन्यमय, आनंदी वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
यावेळी श्री कृष्णकुमार गोयल म्हणाले की, “माझी कामाची ऊर्जा सतत अनेक स्तरातुन भेटणा-या माणसांतुन मिळत असते.आपले काम प्रामाणिक व जिद्दीने करा.संकटांना न घाबरता मोठी स्वप्न बघा.आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या.सतत कामात व्यस्त राहणारी माणसचं काहीतरी करुन दाखवितात. कोणत्याही कामाचा दर्जा ठेवा .दर्जेदार व प्रामाणिक, सचोटीने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल.
आजच्या युवकांकडे प्रचंड काही तरी करण्याची इच्छा आहे. ती युवकांची ऊर्जा योग्य ठिकाणी देशासाठी वापरली पाहीजे.आपल्या उत्पन्नातील एक टक्का तरी समाजाला आपण प्रत्येकाने दिला पाहीजे. आपल्या जवळील नात्यांना हळूवार जपा. चांगले काम करणा-यांच्या मागे आपण उभे राहीले पाहीजे. माझा वाढदिवस साजरा करताना मला मी नव्याने परत भेटल्यासारखे वाटत असते. त्यामुळे माझी कामाची ऊर्जा वाढत असते.”
याप्रसंगी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारने त्यांच्यावर पोष्ट स्टॅप तिकीट काढले. त्याचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच सुप्रसिदध चिञकार कवी दिनेश चव्हाण यांनी सुंदर कलरफुल प्रोट्रेट काढलेले त्यांना भेट देण्यात आले. सर्व स्टाप व मिञ परिवाराच्या उपस्थित मोठा केक कापुन ,पुष्पगुच्छ भेट देत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी नक्षञाचं देणं काव्यमंचचे राष्टीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे (कवी वादळकार,पुणे) यांनी त्यांची दिलखुलासपणे मुलाखत घेतली.त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाशन टाकण्याचा प्रयत्न केला. अनेक संस्था,त्यांचे पदाधिकारी,मिञ परिवार,अनेक मान्यवरांनी त्यांना शाल,पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला.