नवी दिल्ली I झुंज न्यूज : देशभरात आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारल्या गेलं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून संविधान लागू करण्यात आलं. संविधानाच्या माध्यमातून देशात खऱ्या अर्थाने लोकशाही सुरू झाली. प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाली. त्यामुळेच देशात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन देशभरात साजरा करण्यात येतो.
19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाने संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय जारी केला. त्यानुसार देशभरात दरवर्षी संविधान दिवस साजरा केला जातो. त्यानुसार आजच्या दिवशी सरकारी कार्यालयात संविधानाची उद्देशिका वाचली जाते. तसेच संविधानाचं महत्त्व जनतेला कळावं म्हणून विशेष मोहीमही राबवली जाते. संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याची मोहीम राबविणाऱ्यांना प्रमाणपत्रंही दिलं जातं.
संविधानाची उद्देशिका
आम्ही भारताचे लोक, भारतास एक संपूर्ण प्रभुत्व-संपन्न
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यास, तसेच
त्याच्या समस्त नागरिकांना:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म
आणि उपासनाची स्वतंत्रता,
प्रतिष्ठा आणि संधिची समता
प्राप्त करण्यासाठी
तसेच त्यासर्वांमध्ये
व्यक्तिची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता
व अखंडता सुनिश्चित करणारी बंधुता
वाढविण्यासाठी
दृढसंकल्प होऊन आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
नोव्हेंबर 26, 1949 ला एतद्द्वारे या संविधानला अंगीकृत,
अधिनियमित आणि आत्मार्पित करीत आहोत.
संविधानाची गरज काय ?
> संविधानाद्वारे देशातील नागरिकांमध्ये विश्वास आणि सहकार्याची भावना निर्माण केली जाते.
> सरकार कसे स्थापन केले जाते? निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला असेल? हे संविधानाच स्पष्ट करण्यात आलं आहे.
> सरकारच्या अधिकारांची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. तसेच नागरिकांचे अधिकार काय आहेत हे संविधानात स्पष्ट करण्यात आलं आहे.
> श्रेष्ठ समाज निर्मितीसाठी लोकांच्या इच्छा, आकांक्षा संविधानात नमूद करण्यात आल्या आहेत.
संविधानाची मूळ प्रत कोठे आहे?
29 जानेवारी 1950 पासून संविधान लागू झाले. संविधानाच्या तीन मूळ प्रती आहेत. या तिन्ही प्रती संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. संविधानाची ही प्रत खराब होऊ नये म्हणून हेलियम गॅस असलेल्या एका बॉक्समध्ये ती ठेवण्यात आली आहे. त्याकाळी संविधानाच्या निर्मितीसाठी 64 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात या संविधानाची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. भारतीय संविधान जगातील सर्व संविधानांपेक्षा मोठे आहे. सध्या संविधानात एक प्रस्तावना, 22 भाग, 448 अनुच्छेद आणि 12 अनुसूची आहेत.