पुणे I झुंज न्यूज : नेहरू युवा केंद्र केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिर्मान(सबका साथ, सबका, विश्वास, सबका प्रयास) या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
18 ते 29 वयोगटातील युवक यासाठी पात्र ठरणार असून स्पर्धकांनी हिंदी किव्हा इंग्रजी या भाषेतून विचार मांडायचे आहेत. तालुका स्तरावरील स्पर्धकांना प्रमाण पत्र दिले जाणार असून त्याची जिल्हा स्तरावर निवड केली जाणार आहे .
स्पर्धेचे बक्षीस स्वरूप
जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार ५000 रुपये, द्वितीय पुरस्कार 2000 रुपये, तृतीय पुरस्कार1000 रुपये, तसेच राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार 25000 रुपये, द्वितीय पुरस्कार 10000 रुपये, आणि तृतीय पुरस्कार 5000 रुपये. तर राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार 2,00000रुपये,द्वितीय पुरस्कार 1,00000रुपये, आणि तृतीय पुरस्कार 50,000,रूपये, सहभागी स्पर्धकांना प्रोहस्तान10,000 रुपये दिले जाणार आहे.
“नोंदणीची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर असून, इच्छुक स्पर्धकांनी ताबडतोब नोंदणी करावी आणि अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र हवेली तालुका प्रतिनिधी सचिन कदम , संपर्क 8888976271 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.