शिरूर | झुंज न्यूज : गेल्या दोन दिवसांपासून शिरूर तालुक्यात अन् दौंड तालुक्यात जणू रस्त्यांवर पैशाचं पाऊसच पडला की काय, सरपंचांना सापडलेल्या पैशांच पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर त्या पैशांना कोणी वाली आहे की नाही यावर उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर असे की,
वडगांव रासाईचे सरपंच सचिन शेलार हे दौंड तालुक्यातून प्रवास करत असताना केडगाव येथील उड्डाणपुलावर त्यांना पैसे सापडले.
याबाबत त्यांनी सोशल मीडियावर मोबाईल क्रमांक देत रक्कम मोठी आहे. ज्यांची आहे त्यांनी ओळख पटवून घेऊन जा असे आवाहन केले होते.
मात्र दोन दिवस उलटूनही योग्य व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. याबाबत केडगाव पोलिस चौकीच्या पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता अशीच रक्कम शनिवारी केडगाव हद्दीत काही नागरिकांना मिळाली असल्याचे सांगितले. मात्र पैसे कोणाचे याबाबत कोणीही आले नाही अथवा माहिती मिळाली नाही.
शिरूर तालुक्यातील विविध सोशल मीडिया च्या ग्रुप वर अन् स्टेटस वर पैसे मिळाल्याचे माहिती व्हायरल होत असून सरपंच सचिन शेलार यांनी कोणाचे असतील तर त्यांनी ओळख पटवून घेऊन जाण्याचे पुन्हा आवाहन केले आहे.
दरम्यान रक्कम मोठी असेल तर रस्त्यावर पडली कशी? अन् कोणी पुढे का येत नाही याचीच चर्चा रंगू लागली आहे.