औरंगाबाद I झुंज न्यूज : विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य (औरंगाबाद) तथा शब्दगंध समूह प्रकाशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज देशमुख (अ.भा.अ.निं.स. औरंगाबाद) होते. यावेळी एस.बी.देशमुख (मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र राज्य सचिव), संगीता ढोले (महाराष्ट्र पोलीस), रविंद्र वाकोडे(अ.भा.अ.नि.स औरंगाबाद संघटक), नितीन काळे यशवंत (सरपंच सेवा संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, सोलापूर), स्मीता पाटील (आदर्श शिक्षक, साहित्यिक, समाजसेविका, रायगड) तसेच शब्दगंध समुह प्रकाशन तथा विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप त्रिभुवन (आयोजक) इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
पुढील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मान
सौ.स्मिता गणेश पाटील (रायगड), अजय जिरापुरे (अमरावती), अरविंद बकरे (हिंगोली) ,गितांजली वाघ (पालघर), अंगद लोणे (औरंगाबाद ), बाबाराव डोईजड (बुलढाणा), तांबोळी फातेमा अकबर, जयकुमार दाजी व्यवहारे, जि.प.प्राथमिक शाळा केतकी नं.१ ता. चिपळूण जि.(रत्नागिरी), प्रा. सुरज विठोबा गोंडाणे (भंडारा), अंकुश हाके खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा (सोलापूर), सुनिल रुपनर सर पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा (सोलापूर), राजेंद्र कुमार बुध्याळ सर पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा (सोलापूर), शुभांगी शिवाजी क्षिरसागर पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा (सोलापूर), दयानंद बाजीराव पाटिल मारापुर तालुका मंगळवेढा जिल्हा (सोलापूर), एस बी देशमुख (नाशिक), कल्याण पांडुरंग राऊत (लातूर), हेमा हरिभाऊ विद्वत करमाळा जि (सोलापूर), ज्ञानेश्वर शिरसाठ (अमरावती), राजेंद्र विक्रम ढोडरे उपशिक्षक सी. एस.बाफना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फागणे ता.जि.(धुळे), रवींद्र देवरे, नाशिक प्रा.महेश दाखले (पुणे), ललिता जाधव (धुळे), सुषमा खातू (पुणे), सागर तांगडे (पुणे) , बबन महाले (पुणे).
सुत्रसंचलन कवयित्री प्रतिक्षा चंद्रे यांनी केले तर आभार रमा त्रिभुवन यांनी मानले .