मावळ I झुंज न्यूज : राज्यातील शाळा नुकत्याच सुरु झाल्या असून. कोरोनाच्या संकटामुळे गेली वर्ष-दीड वर्ष बंद असणारे वर्ग पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे फुलून निघणार आहेत. या निमित्त मावळातील कशाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देत तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापुन शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी कोरोनाचे संकट अद्याप पुर्णतः टळलेले नाही व कोरोनाचा प्रसार वाढु नये म्हणुन स्वयंभु फाऊंडेशनच्या वतीने मास्क,सॅनिटायझर वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालकांना शाळेच्या पहिल्या दिवसाच्या उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आदर्श सरपंच दत्तात्रय आण्णा पडवळ, आदर्श सरपंच शरदराव बबन जाधव, विस्तार अधिकारी रामराव जगदाळे, तळेगांव बीट, सुनिल माकर केंद्र प्रमुख माळेगांव, मुख्याद्यापक मस्तुद सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ जाधव, ग्रा. सदस्य गणेश भांगरे, प्रशांत जाधव, उपाध्यक्ष मावळ रा.कॉं.सोशल मीडिया, मंगेश जाधव, मा. संचालक भाऊ सुतार, रामकृष्ण जाधव, सरचिटणीस भानुदास कदम, अध्यक्ष सोशल मीडिया आंदर मावळ पूर्व विभाग राजेश पानसरे, दिपक पडवळ, मोदी मॅडम, व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले तर आभार औटी मॅडम यांनी मानले.