शिरूर I झुंज न्यूज : उरळगाव (ता.शिरूर ) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मास्क, गुलाब पुष्प याचे वाटप करून विद्यालयमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा सोमवार (ता.४) पासून सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग ( तापमापक यंत्र), ऑक्सीजन मीटरने ऑक्सिजन लेव्हल चेक करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
“विद्यालयास उपसरपंच स्वाती शशिकांत कोकडे यांनी मास्क, ऑक्सीमिटर, थर्मल स्कॅनिंग यंत्र (तापमापक यंत्र ) आदि साहित्य विद्यालयास मोफत भेट दिले. तुकाराम गिरमकर यांनी सॅनिटायझर दिले. विद्यालयमध्ये पहिला दिवस असल्याने ८० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत विद्यालयांमध्ये काही उपक्रम राबवण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सारिका ताई जांभळकर, उपसरपंच स्वाती कोकडे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच सदस्य अशोक चव्हाण निकिता सात्रस, लंका ताई पाचुंदकर, गजानन जांभळकर, शशिकांत कोकडे, सचिन पाचुंदकर, दत्ता आफळे, गोरख सात्रस, संजय काळे, मुख्याध्यापक हेरंब नरवडे, गोरख सात्रस, बाबू आफळे, संजय काळे, राजेंद्र चव्हाण, किरण माने, अनुराग कोकडे, ऋषिकेश कोकडे, बाबू हरीहार, अक्षय भगत, आरोग्य सेविका लंघे सिस्टर, CH। जना शिरसाठ, MPW मारणे डी.जे, आशा गट प्रवर्तक नंदा कुदळे, आशा स्वयंसेविका वर्षा जाधव, आशा स्वयंसेविका मनीषा जांभळकर, आरोग्य मदतनीस रोहिणी चव्हाण तसेच उरळगाव आरोग्यसेविका व पूर्ण स्टॉप आदी मान्यवर उपस्थित होते..