वाढदिवसाचे औचित्य साधत , महात्मा फुलेंच्या कुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वीकारला पदभार
शिक्रापूर I झुंज न्यूज : तळेगाव ढमढेरे येथील शिवसेचे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष हनुमंत लांडे यांची नुकतीच राष्ट्रीय फुले ब्रिगेड च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड राष्ट्रीय अध्यक्ष चंन्द्र प्रकाश सैनी यांनी केली होती. त्या पदाचा त्यांनी वाढदिवसानिमित्त औचित्य साधून तळेगाव ढमढेरे येथील मार्केट कमिटीच्या आवारात असणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदभार स्वीकारला.
तत्पुर्वी त्यांनी समाजभूषण माळी समाजाचे नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गवाशी किसनभाऊ भुजबळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रीय फुले ब्रिगेड 26 राज्यात काम करत आहे. महाराष्ट्रात आधिच्या पदाधिकाऱ्यांकडून संघटना वाढीसाठी खुप योगदान दिले आहे. त्यावर कळस चढवण्याचे काम मी करणार आहे.
“लवकरच संघटनेचा महाराष्ट्रात विस्तार करुन नविन पदाधिकाऱ्यांची निवड करुन राष्ट्रीय फुले ब्रिगेड महाराष्ट्रात एका उंचीवर नेऊन ठेवणार आहे. तसेच भारतातील मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे वाडा या ठिकाणी सुरु झाली आज त्याची दैनिय अवस्था आहे. त्या ऐतिहासिक वास्तुचा पाया सुद्धा खचला आहे ती वास्तु जतन करण्यासाठी त्याठीकाणी भव्य अशी इमारत बनविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश भुजबळ, रोटरी क्लबचे सचिन लांडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजबळ, बाळकृष्ण भुजबळ, संजय धायरकर, गजानन भुजबळ, उद्योजक अर्जुन लवांगीरे, नितीन पवार च॔द्रकांत भुजबळ आदी उपस्थित होते.