पिंपरी I झुंज न्यूज : माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांनी 1990 साली पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची (पीसीईटी) स्थापना केली. सुरुवातीला महानगरपालिकेच्या भाडेतत्वावर घेतलेल्या जागेवर सुरु झालेल्या या संस्थेने मागील तीस वर्षात के. जी. टू पीएचडी उपलब्ध करुन दिली आहे.
संस्थेने आता गरुडझेप घेतली असून पीसीईटीचा विविध शैक्षणिक विभागाच्या आठ शाखांमध्ये विस्तार झाला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड रिसर्च, एस. बी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स, एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, पुणे बिझनेस स्कूलचा समावेश आहे अशी माहिती पीसीईटीचे सचिव व्हि.एस. काळभोर यांनी दिली.
माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या पंधराव्या स्मृतीदिनीनिमित्त आकूर्डी येथे ट्रस्ट कार्यालयात व्हि. एस. काळभोर यांच्या हस्ते कै. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी पीसीईटीचे खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, पीबीएसचे संचालक प्राचार्य डॉ. गणेश राव, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईनचे संचालक प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, एस. बी. पाटील ज्युनियर कॉलेज संचालक प्राचार्य डॉ. संदिप पाटील, पीबीएसच्या शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मंजू चोप्रा, मनुष्यबळ अधिकारी डॉ. संजीवनी शेळके, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, पीसीईटीचे लेखाधिकारी सुभाष कानेटकर, वसतीगृह अधिक्षक ए. जी. पाटील आदी उपस्थित होते.
“व्हि. एस. काळभोर यांनी सांगितले की, पीसीईटीचे आकुर्डी आणि रावेत येथे दोन शैक्षणिक संकुल आहेत. मागील वर्षांपर्यत येथून बेचाळीस हजाराहून जास्त विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, वास्तूविशारद, व्यवस्थापन शाखेची पदवी प्राप्त केली आहे. यातील 95 टक्क्यांहून जास्त विद्यार्थ्यांना ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागातून नोकरी मिळाली आहे. उर्वरीत विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तर काही परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. पीसीईटीचा नावलौकिक वाढविण्यात ट्रस्टच्या सर्व पदाधिका-यांबरोबरच येथिल उच्चशिक्षित प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचेही योगदान आहे. आगामी काळात ट्रस्टचा आणखी विस्तार करण्याचे नियोजन आहे अशीही माहिती व्हि. एस. काळभोर यांनी दिली.