मुंबई I झुंज न्यूज : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. ही यात्रा सुरू करताना आज राणेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद मागितले. साहेब, मला आशीर्वाद देण्यासाठी आज तुम्ही हवे होते, हे एकच वाक्य मी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर बोललो, असं नारायण राणे म्हणाले.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या यात्रेची माहिती दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून जन आशीर्वादची संकल्पना आली. त्यांनी आम्हा सर्व मंत्र्यांना जनतेपर्यंत जाण्यास सांगितलं. लोकांचे आशीर्वाद घेण्यास सांगितलं. त्यामुळे कालपासून मी विमानतळापासून या यात्रेला सुरुवात केली. हुतात्मा चौकापर्यंत गेलो. लोकांनी, कार्यकर्त्यांनी आमचं स्वागत केलं. मध्ये आम्ही सावरकर स्मारक आणि शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाचंही दर्शन घेतलं. साहेब, आशीर्वाद द्यायला तुम्ही आज हवे होतात. साहेब, आशीर्वाद द्या मला यशस्वी होऊ दे, एवढंच वाक्य म्हणालो. आणि पुढे ही यात्रा निघाली, असं राणे म्हणाले.
गोमूत्रं शिंपडा नाही तर प्या
“गोमूत्र आणि गोमूत्रं यासाठी आलो का ? मला कुणासमोर नतमस्तक व्हावं असं वाटतं तो माझा प्रश्न आहे. इतरांचा हा प्रश्न नाही. ज्यांना गोमूत्र शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. गोमूत्रं प्यायचं तर पिऊ द्या. हे काय स्मारकाकचं सांगतात. ते स्मारक दलदलीत आहे. पँट वर करून तिथे जावं लागतं. राज्यात मुख्यमंत्री त्यांचा आहे. तरीही ही अवस्था आहे. जरा जागतिक दर्जाचे स्मारकं पाहा. ती कशी आहेत ते बघा, असा टोलाही त्यांनी लगावला.