पुणे I झुंज न्यूज : टिंगरेनगर येथील न्याती एन्वायरन सोसायटीतील क्लब हाऊस मध्ये पवित्र श्रावण महिन्यानिमित्त सोमवार दिनांक ०९|०८|२०२१ ते रविवार १५|०८|२०२१ पर्यंत नरेंद्र वाणी यांच्या मुखातून “भागवत गीता चिंतन” सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात कॄष्णभक्त व वैष्णवजनांनी उपस्थित राहून या सप्ताहाचा लाभ घेतला.
दररोज गहन विषय जसे स्वचिंतन, स्वदोषदर्शन, सत्यता, संयम, सदाचार, सुदर्शन, सत्कर्म, समर्पण, स्वधाम,यांसारख्या विषयावर दृष्टान्त देत सरळ व सोप्या शब्दात भक्तांना कृष्णमय रंगवले. दररोज गणेशाला दीप प्रज्वलित करून स्तुती आरती गावून शेवटी समर्पण वंदना करून कार्यक्रम पूर्ण केला जात होता.
मध्यंतरी मधल्या वेळेत भजन किर्तनाच्या लाभहि नागरिकांनी घेतला. दि१५|०८|२०२१ रोजी कार्यक्रमाच्या पूर्णाहूतिचा वेळी भक्तांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे व्यवस्थापन व प्रसादाची जबाबदारी न्याती एक्सलंट योगा ग्रुपने पार पाडली.