पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला असून मोठी खळबळ उडाली आहे.
“स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक कक्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी ठाण मांडून असून तपासणी सुरू आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षामध्ये लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे. एका कंत्राटदाराकडून २ लाख रुपये लाच स्वीकारली म्हणून स्थायी समितीचा लिपिक आणि शिपाई यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
भाजापाची सत्ता असलेल्या महापालिकेत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार होत असल्याच्या बातम्या वारंवार छापून येतात. त्याच्या आधारावर लाचलुचपत विभागाने आज दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू झाल्यानंतर छापा टाकला. समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व नगरसेवकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त थोड्यावेळात…