अखिल भारतीय मुळशी ग्रामीण पत्रकार संघाची सर्वसाधारण बैठक संपन्न ; संघटनेची दमदार वाटचाल सुरु

मुळशी I झुंज न्यूज : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुळशी तालुका ग्रामीण पत्रकार संघाची सर्वसाधारण बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. आयटीनगरी हिंजवडी येथे पार पडलेल्या बैठकीत मागील सहा महिन्याचा सविस्तर आढावा घेऊन, संघटनेची पुढील दमदार वाटचाल कशी असेल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी प्रमुख सदस्य निमंत्रित केले होते. तर, इतर सदस्यांबरोबर ऑनलाईन चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष पप्पू कंधारे, मुळशी तालुका अध्यक्ष रोहिदास धुमाळ तसेच प्रमुख सदस्य उपस्थित होते.

आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने विविध कार्यक्रमांचे पूर्वनियोजन तयार करण्यासाठी, सर्व जिल्हा कार्यकारणीने तालुकानिहाय बैठका घेण्याच्या सूचना केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुळशी तालुका संघाची बैठक हिंजवडी येथे घेण्यात आली.

“या बैठकीत तालुका कार्यकारणी विस्तार करणे, ग्रामीण पत्रकार संघाची ध्येय धोरण तालुक्यातील प्रत्येक पत्रकारांपर्यंत पोहचवणे, संघटन वाढीसाठी सर्वोतपरी प्रयत्न करणे, सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून वर्षभरात किमान चार उपक्रम राबवणे, तालुक्यातील योग्य व्यक्तींचा संघटनेचे स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करणे. तालुक्यातील प्रलंबित असलेल्या समस्या, प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करने, पत्रकारितेचा दर्जा सुधारणे, पत्रकारांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे, संघटनेसाठी हक्काचे मध्यवर्ती कार्यालय उभारणे अशा अनेक मुद्यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली.

यावेळी उपस्थित सदस्यांचा पुष्पगुछ, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात ‘श्री’ च्या मूर्तीला पुष्पहार घालून करण्यात आली. राष्ट्रगीताने बैठकीची संगता करण्यात आली. मार्गदर्शन जिल्हाउपाध्यक्ष पप्पू कंधारे यांनी केले, तर मुळशी तालुका अध्यक्ष रोहिदास धुमाळ यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *