शिरूर : दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी महायुतीच्या माध्यमातून राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. दुग्ध व्यवसाय हा शेतिचा जोडधंदा असून शासनाने दूधाचे दर वाढणे बाबत त्वरीत निर्णय घ्यावा यासाठी सुरू तालुक्यातील टाकळी भिमा गावातही दूध बंद आंदोलन केले.
भाजपा शिरूर तालूका सरपंच आघाडीचे आध्यक्ष आणि टकळी भिमाचे सरपंच रविंद्र दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली दूध आंदोलन करण्यात आले. यावेळी गावातील दुग्ध व्यावसायिक मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते.
“लॉकडाऊनच्या काळात सरकारने शेतकऱ्यांनाकडे सपशेल दुर्लक्ष केले. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना या काळात मोठा फटका बसला. अजूनही दुधाला योग्य भाव मिळत नाहीये. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.”