पिंपळे गुरव येथे रक्तदान शिबिरास तरुणाईचा उदंड प्रतिसाद ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र जगताप मित्र परिवारातर्फे आयोजन

पिंपळे गुरव I झुंज न्यूज : पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मा. नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवारातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास परिसरातील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनपा विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर शकुंतला धराडे, विजय आण्णा जगताप कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, नगरसेवक नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते फजल भाई शेख, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप,नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, माजी नगसेवक राजू बोराडे, जगताप तानाजी जवळकर,अमरसिंग आदियाल जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, महेश भागवत आदींसह राष्ट्रवादीचे अन्य मान्यवर उपस्थित होते.

नवी सांगवी येथील एम एस काटे चौकाशेजारील राजयोग हाईटस (हॉटेल सुरुची तळ मजला) येथे हे शिबीर पार पडले. या शिबिरास परिसरातील तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषता महिला रक्तदात्यांचा सहभागही उल्लेखनीय होता. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून पार पडलेल्या या शिबिरातील सहभागी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र, प्रोटीन सप्लिमेंट तसेच ब्लुटुथ इयरफोन भेट स्वरुपात देण्यात आला.

डॉक्टर व परिचारिकांचा सन्मान

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र जगताप प्रतिष्ठानतर्फे परिसरातील जेष्ठ डॉक्टर वसंत खांडगे, डॉ प्रदीप माकन, डॉ अबोली कदम, पूजा हॉस्पिटल चे प्रदीप ननावरे, डॉ वैशाली लोढा, डॉ आदित्य पतकराव , डॉ चंदन लोखंडे , डॉ संतोष कदम, डॉ वाघमारे तसेच परिचारिकांचा वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ देऊन शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर शकुंतला धराडे,जगदीश शेट्टी यांच्यासह अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दरम्यान यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी बाळासाहेब पिल्लेवार, साहेबराव तुपे, अभिषेक जगताप, अतुल ससाणे, शैलेश दिवेकर, संजीवनी पुराणिक , नितिन कोले, राजेंद्र कोतवाल, संदीप राठोड, पंकज मालविया अर्जुन शिंदे, आनंद दिवेकर आदींनी परिश्रम घेतले.

“याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थीतही रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरास दिलेला उदंड प्रतिसाद कौतुकास्पद आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा भासु नये यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी शहरातील सर्व पदाधिकार्‍यांना रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबत आवाहन केले होते. या भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजनाबद्दल राजेंद्र जगताप यांचे खरोखरच अभिनंदन व कौतुक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *