हिंजवडी I झुंज न्यूज : आयटीनगरीच्या सरपंचपदी विक्रम वसंत साखरे यांची बिनविरोध निवड झाली. आज पार पडलेल्या सरपंच निवडणुकीत साखरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. ग्रामदैवत श्री म्हातोबा परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी निवडीनंतर जल्लोष व्यक्त करत साखरे यांना शुभेच्छा दिल्या. हिंजवडी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी पदी डी. डी. भोजणे यांची नुकतीच वर्णी लागली असून नवा सरपंच आणि नवीन ग्रामविकास अधिकारी हिंजवडी ग्रामपंचायतला मिळाले आहेत.
मुळशी तालुक्यात अतिशय महत्त्वाची मानली जाणारी जागतिक नकाशावर आयटीपार्क म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी परिसराची ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत असते. येथील सरपंच निवडणूक तितकीच महत्वाची असते. आज झालेल्या निवडणुकीत ग्रामपंचायतच्या सरपंच निवडीवेळी ग्रामपंचायतचे सर्व १७ सदस्य उपस्थित होते. एकमेव अर्जामुळे निवडणूक हसत-खेळत बिनविरोध झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मंडल अधिकारी हेमंत नायकवडी व निवडणूक सहाय्यक अधिकारी व्ही ए वाडेकर, तर ग्रामविकास अधिकारी डी. डी.भोजणे यांनी काम पाहिले.
युवानेते सुरेश हुलावळे, नगरसेवक अमोल बालवडकर, तानाजी हुलावळे, राहुल जांभुळकर, संतोष साखरे, ऍड.शिवाजी जांभुळकर, मल्हारी साखरे, शाम हुलावळे, सूर्यकांत साखरे, मा.सरपंच गणेश जांभुळकर, उपसरपंच रेखा साखरे, बाळासाहेब पिंजण, प्रदीप साखरे, मोरेश्वर भोंडवे, दिलीप हुलावळे, शिवनाथ जांभुळकर, शरद जांभुळकर, विशाल साखरे व विविध मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
“हिंजवडीच्या अर्थकारणाला चालना व गती देण्यासाठी सर्व सदस्य यांच्या सोबतीने ग्रामपंचायत पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करणार असून ग्रामपंचायतच्या भूमिकेतून गावातला विकास साधणार आहे. पिण्याच्या पाण्याची सर्वात मोठी गैरसोय आहे, ती सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पाणीप्रश्न सोडवणे हे प्रमुख ध्येय असल्याचे विक्रम साखरे यांनी सांगितले.