पिंपरी : कोरोना संसर्गाने मृत्यु झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकांना मूखदर्शन मिळावे, अशी मागणी विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी आयूक्त श्रावण हार्डिकर यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामधे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे आजपर्यंत १७ हजार बाधीत रूग्ण आढळले आहे ३२१४ जनांवर वेगवेगळे उपचार सुरू आहेत. कोरोनाने २५२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अलिकडे बाधीत रुग्णांचे आकडे हाजाराच्या पटीत पोहोचले आहे. त्यामूळे शहरातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने मृत्यू झालेल्या रूग्णाचा देह प्लॅस्टिक वेष्टणामध्ये पॅक करून नातेवाईकांना न दाखविताच त्यांच्या उपस्थितीत पालिके मार्फत अंत्यसंस्कार केले जातात.
नातेवाईकांना त्याचा चेहरा सूध्दा पाहता येत नाही. त्यामूळे नातेवाईक भावनीकदृष्ट्या खचून जातात तरी नातेवाईकांना अखेरचे मूखदर्शन मिळावे अशी अपेक्षा नातेवाईक करत आहेत. यासाठी आयूक्तांनी निर्णय घेऊन व्यवस्था करावी अशी मागणी नाना काटे यांनी पत्राद्वारे केली आहे.