खुशखबर ! ; केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करणार ४००० रुपये

नवी दिल्ली I झुंज न्यूज : केंद्र सरकार जून महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० रुपये पाठवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना २००० रुपये देण्यात आले होते. आतापर्यंत ९ कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदवले आहे.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल. नाव नोंदवल्यानंतर केंद्र सरकार थेट तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करेल.

४००० रुपये मिळवण्यासाठी काय कराल ?

गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना २००० रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आत शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत आहे. तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

रजिस्ट्रेशन कशाप्रकारे कराल ?

१. सर्वप्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा.
२. Farmers Corner या ऑप्शनवर क्लिक करा.
३. आता तुम्हाला New Farmer Registration हा पर्याय निवडावा लागेल.
४. नवा टॅब ओपन झाल्यावर त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा.
५. त्यानंतर आपली माहिती आणि जमिनीचा तपशील नमूद करावा.
६. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.

आर्थिक मदत कधी मिळणार ?

एखाद्या शेतकऱ्याने जून महिन्यात नोंदणी केली तर त्याला योजनेचा आठवा हप्ता जुलै महिन्यात मिळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुढचा हप्ता मिळेल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *