रिया चक्रवर्ती हिने सुशांतला धमकावले होते ; सुशांतचे वडिल के के सिंह यांचा गंभीर आरोप

मुंबई : सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे आणि अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुशांतच्या वडिलांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘माझा मुलगा सुशांतला फिल्म लाइन सोडून केरळमध्ये सेंद्रिय शेती करायची होती, त्याचा मित्र महेश त्याच्याबरोबर कुर्गला जाण्यास तयार होता, जेव्हा रियाने सांगितले की, ‘तू कोठेही जाणार नाहीस. आणि जर तू माझे ऐकत नसेल तर मी तुझा मेडिकल रिपोर्ट मीडियात देईन आणि सर्वांना सांगेल की तू वेडा आहेस’.

सुशांतच्या वडिलांनी तक्रार दिली आहे की, जेव्हा रियाने पाहिले की सुशांत तिचं म्हणणं ऐकत नाही आणि त्याचा बँक बॅलन्स खूपच कमी झाला आहे, तेव्हा रियाला वाटले की आता सुशांतचा तिचा काही उपयोगाचा नाही. सुशांतसोबत राहणारी रिया ८ जून रोजी रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, पासवर्ड, क्रेडिट कार्ड आणि त्याचा पिन क्रमांक, सुशांतची महत्वाची कागदपत्रे आणि उपचारांची कागदपत्रे घेऊन सुशांतच्या घरुन निघून गेली होती.

केके सिंह यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की, तिने सुशांतचा फोन नंबर ब्लॉक केला होता. यानंतर सुशांतने माझ्या मुलीला फोन केला होता आणि म्हणाला होता की, रिया मला कुठेतरी अडकवेल, ती इथून बऱ्याच वस्तू घेऊन गेली आहे आणि मला धमकी दिली आहे की, जर तू माझे ऐकले नाही तर तुझे मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये लीक करेल आणि सांगेल की तू वेडा आहेस. तुला कोणी काम देणार नाही आणि तू बर्बाद होऊन जाशील.’

केके सिंह यांनी अशी देखील तक्रार दिली आहे की, ‘सुशांतची मॅनेजर असलेल्या दिशाने आत्महत्या केल्यानंतर सुशांतने ८ जून रोजी रियाला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण तिने सुशांतचा फोन नंबर ब्लॉक करुन ठेवला होता. रियानेच दिशाला सुशांतची मॅनेजर बनवलं होतं. सुशांतला भीती होती की, रिया सुशांतला दिशाच्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरवेल.’

के के सिंह यांच्या जबाबातून हा सर्व उलगडा झाल्या नंतर सुशांतची गर्ल फ्रेंड रिया सेन हिच्या विरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला असून आता हे तपास अंतिम टप्प्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *