माळशिरस : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी रोहित विलास खाडे रा. म्हाळुंग ता माळशिरस यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
खाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांनी हि नियुक्ती केली.
याप्रसंगी माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, म्हाळुंग ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रांत काटे उपस्थित होते. सर्व स्तरावरून रोहित खाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.