शालेय फी साठी तगादा लावला तर शालेय शिक्षण मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही ; क्रांतीकारी आवाज संघटनेचा इशारा…

पुरंदर | झुंज न्यूज : पाठीमागील वर्षी एक ही दिवस शाळा भरली नसताना खासगी शाळांनी शंभर टक्के फी वसुली केली आहे. आता या वर्षी सुद्धा शाळा कधी भरणार आहे. आणि किती दिवस भरणार आहे हे माहिती नसताना अनेक शाळा फी वसुली करत आहेत… अनेक संकटानी पालकांचे कंबरडे मोडले असताना खासगी संस्था चालक नफा कमवण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थाकडून फी वसुली झाली तर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु झाल्याशिवाय फी भरू नका असे फसवे आवाहन केल्याचा आरोप संघटनेतील कार्यकर्त्यांनी केला आहे. केवळ संस्थेचे हीत लक्षात घेऊन ही घोषणा करण्यात आली आहे. कारण शाळा सुरु करून फी वसुली केली जाईल आणि नंतर कोरोनाची तिसरी लाट आली तर परत वर्षभर शाळा बंद राहीली तर याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल क्रांतीकारी संघटनेने उपस्थित केला आहे.

त्यामुळे सन २०२२-२२ या शैक्षणिक वर्षाची शैक्षणिक फी फक्त दहा टक्के घेऊन उरलेली फी शैक्षणिक वर्ष संपल्यावर घेण्यात यावी अशी मागणी संघटनेने निवेदन देऊन केली आहे.

क्रांतीकारी आवाज संघटनेच्या वतीने बारामती, सोलापूर, सातारा, नागपूर जिल्ह्यात निवेदन देण्यात आली आहेत. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांना ही निवेदन पाठवण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सागर पोमन यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *