मदत नव्हे कर्तव्य ! श्री मार्तंड देवस्थान जेजुरी संचालित कोविंड केअर सेंटरमध्ये धान्य वाटप

जेजुरी I झुंज न्यूज : संपूर्ण जगात कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे “मदत नव्हे कर्तव्य” हा उपक्रम हाती घेवुन “श्री मार्तंड कोविड सेंटर जेजुरी ” या ठिकाणच्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असणाऱ्या १५० बंधू-भगिनींनसाठी दररोजच्या जेवणासाठी उपयुक्त असे धान्य रुपी वस्तु वाटप करण्यात आल्या आहेत.

या उपक्रमअंतर्गत वाटप करण्यात आलेले धान्य व वस्तू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त संदिप (आप्पा) जगताप, विश्वस्त प्रसाद शिंदे, खांदेकरी मानकरी जालिंदर ( नाना ) खोमने, काका कुंदळे, मा. शहराध्यक्ष भाजपा अशोक खोमणे, घाडगे साहेब, विनोद विरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

पोलीस फ़्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भाग्यदेव घुले, मनीष चौधरी, विनेश भोजे, अमोल देवकर, दत्त घुले, मारुती मोरे, दत्तात्रेय घुले, दिलीप घुले, रोहिदास जोशी, नंदू घुले, अशोक वहिले व नामदेव गोळे यांच्या विशेष सहकार्यातून या उपक्रमाचे आयोजन केले होते.

विनेश भोजे, भाग्यदेव घुले, व मनिष चौधरी म्हणाले कि,

आपण काही समाजाचे देणे लागतो याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत “मदत नव्हे तर कर्तव्य”हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तसेच सर्वांसाठी खंडेराया चरणी एकच प्रार्थना आहे येणारा काळ आपणाकरीता आपल्या स्वजनांकरीता आरोग्यदायी रहावो..! आपण लवकरच सर्वजन या परिस्थितीतून बाहेर यावे. तसेच अशाप्रकारे येणाऱ्या प्रत्येक संकट प्रसंगी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे “श्री मार्तंड कोविड सेंटर जेजुरी” यांनी सांगितले.

यावेळी मनिष चौधरी, उद्योजक विनेश भोजे, भाग्यदेव घुले, अमोल देवकर, सतिश बांदल, दत्ता घुले, दत्तात्रय (बाळु) घुले, मारुती मोरे, रोहिदास जोशी, नंदु घुले, नामदेव गोळे, अशोक वहिले, प्रल्हाद घुले आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *