नवी दिल्ली I झुंज न्यूज : संसदेत जामर असताना जिओ कंपनीलाच फक्त नेटवर्क कसे ? जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट का देण्यात आली. जिओचा मोबाईल नेटवर्क जामरच्या बाहेर आहे का, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान का आहे ? असे सवाल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केला.
खासदार बारणे म्हणाले, संसदेचे कामकाज सुरू असताना कोणाचेही फोन लागू नयेत यासाठी जामर लावले जाते. भारत सरकारची बीएसएनएल आणि एमटीएल कंपनी आहे. या कंपनीला देखील जामर आहेत. देशभरात या कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत देखील नाही. लोकसभेत बीएसएनएल, एमटीएलचे नेटवर्क चलत नसताना फक्त जिओचे नेटवर्क येत आहे.
या कंपनीला जामरच्या बाहेर ठेवले आहे का, हे योग्य नाही. जिओ कंपनीला सपोर्ट केले जात आहे. त्यांच्यावर मेहरबानी का दाखविली जात आहे. जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट का देण्यात आली. जिओचा मोबाईल नेटवर्क जामरच्या बाहेर का आहे, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान का आहे ? असे विविध सवाल खासदार बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केले. त्यावर पीठासीनावर विराजमान असलेल्या रमादेवी यांनी याबाबत अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेतील, असे सांगितले.