थेरगाव परिसरात ‘पोलिओ रविवार’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद ; पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्या हस्ते शुभारंभ

थेरगाव I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात सर्वत्र राबविण्यात येत असलेल्या ‘पोलिओ रविवार’ उपक्रम थेरगाव परिसरातील गुजरनगर येथे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्या हस्ते पोलिओ लस बाळाला देऊन शुभारंभ करण्यात आला.

पोलिओचा डोस देण्यासाठी मुलांना घेऊन पालकांनी गुजरनगर येथे पोलिओ बूथवर सकाळपासूनच गर्दी केली होती. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात आली.

“ठराविक आजाराच्या विरोधात विविध औषधांच्या माध्यमातून इंजेक्शन व तोंडाद्वारे पोलिओ लस ठराविक आजाराच्या विरोधात बाळाच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लस आवश्‍यक आहे. कारण विविध आजारांचा संसर्ग किंवा साथीपासून बाळाला सुरक्षित ठेवता येते व संरक्षण मिळते. अशी माहिती यावेळी महापालिका रुग्णालय कर्मचारी मिना खेडकर यांनी दिली. या मोहिमेत मयूर खरात, पूजा डोरले यांनी मदतनीस म्हणून जबाबदारी पार पाडली.

देश पोलिओमुक्त करण्यासाठी गेली काही दशके सरकार ‘पोलिओ रविवार’ ही योजना राबवत आहे. अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने या उपक्रमाला हातभार लावत असतात. गुजरनगर परिसरातील नागरिकांनीही पोलिओ बूथसाठी सहकार्य दाखविले. त्यामुळे उत्साहात पोलिओ रविवार अभियान पार पडले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *