सारथी वाहतूक आघाडी असोसिएशनच्यावतीने प्रथमच रक्तदान शिबीर ; संजीवनी रक्तपेढीने केला त्या ६० रक्तदात्यांचा सन्मान

(प्रतिनिधी : सागर पोमण )

पुरंदर I झुंज न्यूज : सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन संस्थेच्यावतीने पुरंदर तालुक्यातील बोपगाव या ठीकाणी प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सारथी संस्थेच्या या पहिल्याच रक्तदान शिबिरात तब्बल ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना संजीवनी रक्तपेढी यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश मनोहर कांबळे, सचिव सागर पोमण, कार्याध्यक्ष प्रशांत राठोड, खजिनदार राकेश शिंदे, म.प्रदेशाध्यक्ष अण्णाराव घुगे, वाहतूक वि.अध्यक्ष अभिजित शेळके इतर सारथी सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 या शिबिरात रक्तदान करण्यासाठी सारथी सभासद जेजुरी, बारामती, दौंड, इंदापूर, फलटण, सातारा, पंढरपूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, पुणे, खेड, मुंबई, पालघर, चिपळूण या ठिकाणचे सारथी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *