पिंपरी I झुंज न्यूज : थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानामध्ये उद्यान परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, उद्यानात व्यायामासाठी आलेले नागरिक, उद्यान परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.
“ या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत लोहार, हरिष आप्पा मोरे, सुभाष साळुंखे, अनिल वडघुले यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अनेक क्रांती विरांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
ज्येष्ठ सदस्य विष्णू पंत तांदळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील कोलते यांनी आभार व्यक्त केले.