पुणे I झुंज न्यूज : आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी ‘) मध्ये अभिवादन करण्यात आले.
यावेळी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. डॉ. वेर्णेकर यांनी नेताजींच्या नेतृत्वगुणांचा परिचय करून दिला.
नेताजी बोस यांच्या जयंतीपासून ‘ इन्फर्मेशन टू इन साईट ‘ विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अजीत मोरे, डॉ. विनोद इंगवले, डॉ. नीलेश महाजन, डॉ. दीपाली कदम यांनी मार्गदर्शन केले.