मुळशी I झुंज न्यूज : आदर्शगाव म्हणून नावाजलेल्या अंबडवेट येथील स्केचबुक हाऊसिंग सोसायटीमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने आदिवासी समाजातील कातकरी महिलांसोबत हळदीकुंकू चा एक अनोखा आदर्श उपक्रम राबविण्यात आला होता.
स्केचबूक हाऊसिंग सोसायटीत हळद कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यावेळी मोहोळ नगर वस्ती असलेली आदिवासी समाजाची कातकरी लोकवस्ती मधील सर्व महिलांना हळदी कुंकवाचे निमंत्रण देण्यात आले होते.
“ या कार्यक्रमात सर्व कातकरी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे त्यांच्या वस्ती मधील होणार्या अडचणीवर मात कशी करावी यासाठी स्केचबुक हाऊसिंग मधील महिलांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व आलेल्या अडचणीवर मात करून मोलाची साथ लाभेल असे आश्वासन कार्यक्रम आयोजन करणार्या सर्व महिलांनी दिले.
कार्यक्रमाचे आयोजन चैत्राली कथले, स्वाती फुलारी, शितल भेगडे, प्रतिक्षा खरात, रूपाली शिरसाट, प्रियंका जाधव यांनी केले होते. यावेळी उपस्थित असलेल्या स्केचबूक हाऊसिंग सोसायटी चेअरमन जयश्री आबासाहेब साळुंखे यांनीहि या कार्यक्रमांमध्ये कातकरी समाजामधील सर्व महिलांच्या लहान मुलांसाठी पुढील शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांच्या मुलांसाठी येणाऱ्या तरुण पिढीसाठी शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.