वाकड येथे बुधवारी टेनिस बॉल नाईट स्पर्धा ; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि विशालभाऊ वाकडकर सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजन

वाकड I झुंज न्यूज : युवकांच्या कला व क्रिडा गुणांना संधी मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि विशालभाऊ वाकडकर सोशल फाऊंडेशनच्या वतीने टेनिस बॉल नाईट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी (दि. ३० डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५:३० वाजता वाकड, भुजबळ चौक, रानजाई हॉटेलच्या मागे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, तसेच भाऊसाहेब भोईर, हणुमंत गावडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, मंगलाताई कदम, माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे तसेच जगदिश शेट्टी, प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, संदिप उर्फ लाला चिंचवडे, शहर राष्ट्रवादी प्रवक्ते फझल शेख आदी उपस्थित राहणार आहे.

“बुधवारी (दि. ६ जानेवारी २०२१) सायंकाळी ६ वाजता विजेत्या संघांना रोख पारितोषिक ‘विशाल चषक २०२० – २१’ देऊन गौरविण्यात येईल. प्रथम क्रमांक मिळविणा-या संघास ३३,००० रुपये , व्दितीय क्रमांक २२,००० रुपये, तृतीय क्रमांक ११,००० रुपये आणि चतुर्थ क्रमांक मिळविणा-या संघास ५,००० रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. साखळी पध्दतीने होणा-या या टेनिस बॉल नाईट स्पर्धेत ८० हून जास्त संघांनी सहभाग नोंदविला आहे. ज्या संघांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी ९८५०९९९९९७ या नंबरवर संपर्क साधावा असेही आवाहन विशाल वाकडकर यांनी केले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *