पुणे I झुंज न्यूज : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलीटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरीष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. २१ डिसेंबर रोजी हे शिबीर ऑनलाईन पध्दतीने पार पडले.
यावेळी युनिक अॅकॅडमीचे समुपदेशक प्रवीण बुगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.पी. ए. इनामदार हे अध्यक्षस्थानी होते. तर प्राचार्य डॉ. शैला बूटवाला, डॉ. इब्राहिम जागीरदार, नूरजहाँ शेख, हसीना शेख, दिगंबर इंगळे, गोविंद हिबारे, हर्षल लवंगारे उपस्थित होते.