(प्रतिनिधी : औदुंबर पाडुळे )
निगडी I झुंज न्यूज : दरवर्षी चंपाषष्ठी निमित्त निगडी येथील खंडोबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होत असतात. मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्यावतीने चंपाषष्ठी निमित्तदरवर्षी तीन दिवस सुरू असणारे धार्मिक कार्यक्रम रद्द यावर्षी रद्द करण्याचा निर्णय झालेल्या सर्व साधारण बैठकीत घेण्यात आला.
यावेळी श्री खंडोबा देवस्थान चे अध्यक्ष तानाजी काळभोर, उपाध्यक्ष सोमनाथ काळभोर, कार्यध्यक्ष शंकर काळभोर , सचिव भाऊसाहेब काळभोर, खजिनदार जंगलीमहाराज काळभोर , विश्वस्त दिपक काळभोर, राजेंद्र ल. काळभोर, दिलीप काळभोर, अॅड राजेंद्र काळभोर, तुकाराम काळभोर, शंकर पा.काळभोर, राजू अ. काळभोर , शामराव काळभोर बैठकीस उपस्थित होते.
रविवार दि. २० रोजी चंपाषष्ठी दिवशी मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा पूर्णपणे बंद राहणार असून यंदा जागरण गोंधळ, पालखी मिरवणूक, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी काळभोर यांनी दिली.