सांगवी | झुंज न्यूज : मराठवाडा जनविकास संघ पिंपळे गुरव यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने गड किल्ले स्पर्धा घेण्यात आली होती . या स्पर्धेत ऐकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक सरस्वती अनाथ आश्रय दापोडी तर दुसरा क्रमांक सांगवी मधील शिक्षक सोसायटी तर तृतीय क्रमांक शांताराम बाईत प्रतिष्ठान यांनी मिळविला. मराठवाडा जनविकास संघ मार्फत भव्य चषक अरूण पवार (अध्यक्ष मराठवाडा जनविकास संघ) मा.रोहीदास बोऱ्हाडे (पोलीस नाईक) यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघांना मेडल देऊन गौरविण्यात आले.
अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळी गोड होण्यासाठी ब्लेकेट देण्यात आले. सर्व मुलांनी एकत्र फराळाचा आनंद घेतला. अरूण पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व शाळेमध्ये गड किल्लेंची सहल आयोजन करावे तरच मुलांना गड किल्ले ची जास्त माहिती मिळेल. आपण आपल्या परिसरात दिवाळी मध्ये किल्ले करावीत.
यावेळी राम पवार (सहा. पोलीस फौजदार), गणेश धामणकर (पोलीस नाईक), रवींद्र बाईत, ह.भ.प. पुरूषोत्तम वाघमारे (भैरवनाथ मंदिर पुजारी पिंपळे गुरव), कृष्णाजी खडसे (अध्यक्ष पितामह भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ),देविदास सुरवसे (अध्यक्ष सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम) मान्यवर उपस्थित होते.