शिरूर I झुंज न्यूज : आमदार अशोक बापू पवार यांच्या माध्यमातून ५० % डिस्काउंट मध्ये पिठाच्या गिरणीचे वाटप संपूर्ण शिरूर तालुक्यामध्ये होत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर टाकळी भिमा येथे १९ पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले .
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी आप्पा वडघुले, टाकळी भिमाचे पोलीस पाटील प्रकाश करपे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष वडघुले, पारोडी गावचे माजी सरपंच चिंतामण टेमगिरे, दहिवडीचे उपसरपंच वाल्मीक सातकर, सोसायटीचे संचालक योगीराज धुमाळ, मा. ग्रा.सदस्य उमेश काळे, सामाजिक कार्यकर्ते बबनराव वडघुले, योगेश वीर व ग्रामस्थ उपस्थित होते.