अभिमानास्पद ! पेरीविंकल स्कुलच्या मल्हार कंधारेने पटकावले त्वायकांदो स्पर्धेत सुवर्णपदक…

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील – राजेंद्र बांदल

बावधन I झुंज न्यूज : पुणे येथे झालेल्या  ४ थ्या त्वायकांदो फॉर ऑल ओपन इंटरक्लब चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेमध्ये पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज बावधन येथील इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी मल्हार दिपक कंधारे याने त्वायकांदो  स्पर्धेत पुणे विभागातून सुवर्णपदक पटकावले.

विद्यार्थ्यांना पेरिविंकल स्कूलमध्ये केवळ शिक्षणच नव्हे तर इतर सुप्त गुण वाढीस लागण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते व तसे प्रोत्साहन मुलांना नेहमीच दिले जाते. विद्यार्थ्यांमधील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच अविरतपणे झटत असतात.

यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल व तडफदार संचालिका कु.शिवानी बांदल यांनी मल्हारचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *