स्व. लक्ष्मणभाऊंनी केलेल्या विकासकामांची पावती ; शंकर जगताप यांना विक्रमी मताधिक्यातून देणार

  •  महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या समर्थनार्थ रहाटणीतील ग्रामस्थांची ‘वज्रमुठ’!
  •  रहाटणीतील ‘लाडक्या बहिणीं’कडून शंकर जगताप यांचे जोरदार स्वागत

चिंचवड I झुंज न्यूज : स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप यांच्या माध्यमातून रहाटणी गावचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या आमदार निधीतून रहाटणी गावाचा जो अविश्वसनीय विकास झाला आहे, त्यामुळे आम्हाला रहाटणीकर म्हणवून घेताना अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या याच विकासकामांची पावती म्हणून आम्ही सर्व रहाटणीतील नागरिक एकजुटीने आणि एकमताने शंकर जगताप यांना मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवणार; असा संकल्प रहाटणी ग्रामस्थांनी केला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा रहाटणी गावात झंजावाती प्रचार दौरा पार पडला. या दौऱ्यात रहाटणी परिसरात भव्य पदयात्रा काढून जगताप यांनी रहाटणीकरांना अभिवादन करून त्यांच्याशी संवाद साधला. रहाटणी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात नारळ वाढवून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर शंकर जगताप यांनी रहाटणीतील रामनगर, गोडांबे चौक, नखाते वस्ती, वर्धमान अंगण, क्रिस्टल ज्ञानगंगा सोसायटी, बसवेश्वर चौक, तमारा सोसायटी, रोज लँड सोसायटी, रहाटणी फाटा, एस.एन.बी.पी स्कूल रोड, नखाते वस्ती, शास्त्रीनगर, रायगड कॉलनी, हॉटेल कुणाल सह शिवतीर्थ नगर, शास्त्री नगर या परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हलगीच्या तालात जागोजागी पुष्पवृष्टी करून नागरिकांनी जगताप यांचे जोरदार स्वागत केले.

या पदयात्रेत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष सनी मानकर, माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश तरस, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक बाबा त्रिभुवन, माजी नगरसेविका सविता खुळे, गोपाळ माळेकर, माजी नगरसेवक कैलास थोपटे, स्विकृत सदस्य संदीप नखाते, नरेश खुळे, अरुण चाबुकस्वार, गणेश नखाते, संदीप काटे, देविदास तांबे, राकेश नखाते, बाळासाहेब नखाते, सुनील कुंजीर, सागर कोकणे, विजय कांबळे, संजय भोसले, दीपक जाधव, निलेश नखाते, बाबू तांबे, रवी मसतूद, शिवसेनेचे प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, माधव मनोरे, काळूराम कवितके, संतोष जगताप, नामदेव शिंत्रे, बाळासाहेब काळे, दत्ता दाखले, विनोद चौधरी, विनोद नखाते, कांतीलाल शेलार, शामराव गोडांबे, पोपट कापसे, सागर खेडेकर, विठ्ठल नखाते, संतोष नखाते, सुजाता नखाते, पै. किशोर नखाते, काळूराम थोपटे, सोमनाथ कापसे, अरुण तांबे, कपिल कुंजीर, कुणाल लांडगे, आदित्य काटे, केतन काटे, भांदास काटे, आनंद देवकर, अजय कदम, काळूराम नढे, सुभाष दराडे, नितीन काळे, कैलास परभाने, अक्षय बाराते, सुवर्णा राक्षे, अनिल नखाते, निलेश नखाते, मनोज नखाते, महेश नायकोडे, विशाल माळी, ऋषिकेश नखाते, श्रीकृष्ण भोरे, शशिकांत जाधव, दादासाहेब पाटील, बाळा माने, रणजीत घुमरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि महिला वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिंचवडमध्ये पुन्हा कमळच फुलविणार; ‘लाडक्या बहिणीं’चा निर्धार

या पदयात्रेत रहाटणीतील महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. जागोजागी एकत्रित येऊन महिलांनी शंकर जगताप यांचे औक्षण केले. तसेच ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केल्याबद्दल महायुती सरकारचे कौतुक केले. व ही योजना अशीच सुरू राहावी यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचे आहे. आणि त्यासाठी “चिंचवडमध्ये आम्ही कमळच फुलविणार” असा शब्दच या लाडक्या बहिणींनी शंकर जगताप यांना दिला.

रहाटणीत स्व. लक्ष्मणभाऊ आणि अश्विनीताई यांच्या आमदार निधीतून विविध सोसायट्यांमध्ये व रस्त्यालगत सौर ऊर्जेचे दिवे, विविध ठिकाणी दगडी पारचे बांधकाम, मनपाच्या मोकळ्या जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी चावडी, विविध सोसायट्यांमध्ये व अंतर्गत गल्ल्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक, प्रभागात 5 इंची, 8 इंची आणि 10 इंची ड्रेनेज लाईन, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी लोखंडी बेंचेस, विविध सोसायट्यांमध्ये पाण्यासाठी बोअरवेल, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण अशी कोट्यावधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. पुढील काळातही रहाटणीतील नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असेल. – शंकर जगताप, (महायुतीचे उमेदवार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *