मागासवर्गीय जनतेसाठी विविध योजना आणण्याचा प्रयत्न ; आमदार महेश लांडगे यांची ग्वाही…

भोसरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड मधील मागासवर्गीय जनतेसाठी विविध प्रकारच्या प्रभावी विकास योजना आणि प्रकल्प राबविण्याचा भविष्यात प्रयत्न असेल अशी ग्वाही भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले महायुतीचे उमेदवार आमदार महेश दादा लांडगे यांनी दिली.

भोसरी विधान सभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. महेशदादा लांडगे यांचे हात बळकट करण्यासाठी भोसरी विधानसभेतील मातंग तथा मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी आमदार अमित गोरखे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, बापू घोलप, डॉ. धनंजय भिसे, नितीन घोलप, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कीर्ती जाधव, मारुती जाधव, अरुण जोगदंड, युवराज दाखले तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील ४०० पेक्षा जास्त मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांनी केलेले भोसरी विधान सभेतील कार्य अतुलनीय आहे. मी आमदार होत असताना त्यांनी मला केलेले हक्काने मतदान हे समाज कधीही विसरणार नाही, आज भोसरी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे असे संविधान भवन त्यांनी उभे करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मोठी मानवंदना दिलेली आहे, ते स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष असताना निगडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बांधण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर दरवर्षी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाला मनपाकडून मोठे अनुदान देण्याचे कामही ते करीत आहेत. त्यांच्या मतदारसंघातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांनी आरटीई च्या माध्यमातून मोफत प्रवेश मिळवून दिलेले आहेत, भोसरी मतदारसंघात मागासवर्गीयांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

पंतप्रधान आवास योजना, घरकुल योजना, एसआरए प्रकल्प येथे हक्काचे घर मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच महायुतीच्या माध्यमातून मातंग तथा मागासवर्गीय समाजाला नुकतेच घरकुल बांधणीचे अनुदान दीड लाख हुन अडीच लाखापर्यंत करण्यात आले. त्याच बरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील निवासस्थान, पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक, बार्टीच्या धरती वर आर.टी. ची निर्मिती असेल अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील स्मारक असेल अशा अनेक चांगल्या गोष्टी महायुती सरकारने केलेल्या आहेत. त्यामुळें संपूर्ण मागासवर्गीय समाज महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या सोबतअसेल, व त्यांच्या विजयात भोसरी तील मागासवर्गीय जनतेचा मोठा वाटा असेल.असे आ. गोरखे म्हणाले.

आमदार महेशदादा लांडगे यांनी येणाऱ्या काळामध्ये भोसरीतील मागासवर्गीय जनतेसाठी अनेक योजना आणण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले त्याचबरोबर त्यांनी आज पर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा समोर मांडला. कार्यक्रमाचे आयोजन मारुती जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण जोगदंड यांनी केले. आभार युवराज दाखले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *