“जल्लोष लोककलेचा” महोत्सव उत्साहात संपन्न

बालरंग भूमी परिषदच्या वतीने आयोजन ; ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे I झुंज न्यूज : बालरंग भूमी परिषद मध्यवर्ती आयोजित बालरंगभूमी परिषद पुणे शाखा संचलित “जल्लोष लोककलेचा “हा महोत्सव 24 सप्टेंबर2024 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड या ठिकाणी संपन्न झाला.

हा महोत्सव महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित होता. एकल मध्ये नृत्य ,गायन, वादन तसेच सांघिक मध्ये समनृत्य व समूह गायन या प्रकारामध्ये पुणे जिल्ह्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. 6 ते 15 वयोगटातील 600 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या महोत्सवाचे उद्घाटन नटराज पूजन व दिपप्रज्वलन करून बाल रंगभूमी परीक्षा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दिपाली शेळके व मान्यवर परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण अभिनेत्री व मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्ष सौ नीलम ताई शिर्के – सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळेस बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार , कोषाध्यक्ष सतीश लोटके, उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे , प्रकाश पारखी , शाहीर मावळे, उपस्थित होते.

परीक्षक म्हणून प्रदीप फाटक, शशाहीर श्रीकांत शिर्के, सुचित्रा जोगळेकर , उदय पाटील वैष्णवी गिरे यांनी परीक्षण केले. विशेष सहकार्य करणारे अरुण पटवर्धन ( उपाध्यक्ष बालरंग भूमी परिषद), संजय जगताप (जगताप ऍग्रो एजन्सी ,शिक्रापूर) जतीन पांडे, (सहकार्यवाह बालरंग भूमी परिषद) यांचा सन्मान अध्यक्ष नीलम ताई शिर्के -यांच्या हस्ते करण्यात आला.

सूत्रसंचालन बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष नारायण करपे यांनी केले. तर आभार बालरंगभूमी परिषदेच्या कार्यकारणी सदस्य मुग्धा वडके यांनी मानले. देवेंद्र भिडे, दिलीप अष्टेकर, स्मिता मोघे, संपदा देवधर , प्रसाद कुलकर्णी, प्रसाद घोटवडेकर, मंगेश चव्हाण , मनोज डालिंबकर , विजय पाटील, रुपाली नेवसे ,संध्या धुमाळ, सतीश कारेकर, शेखर भागवत ,अभिजीत इनामदार , मंदार बापट , अर्चना यादव, तांबे सर, मुग्धा वडके, शिवशरण या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे जल्लोष लोककलेचा हा महोत्सव यशस्वीपणे पार पडला.

जल्लोष लोककलेचा निकाल पुढील प्रमाणे

समूह नृत्य
1) सर्वोत्कृष्ट ११,०००/-सन्मानचिन्ह प्रमाणपत्र – विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी ,तालुका शिरूर
2) उत्कृष्ट 7,000/सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र – मास्टर माईंड स्कूल, भोसरी
3) उत्तम 5,000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – विद्या प्रतिष्ठान, तालुका भोर
प्रशंसनीय 1) 2000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – विद्या निकेतन, चाकण तालुका खेड
प्रशासनीय 2) 2000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – अभिनव विद्यालय, सरदवाडी, तालुका शिरूर

समूह गान
1)सर्वोत्कृष्ट11,000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – शाहीर हिंगे प्रबोधिनी, पुणे
2)उत्कृष्ट 7,000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – ज्ञानगंगा विश्वविद्यालय, बाबुराव नगर, तालुका शिरूर,
3) उत्तम 5000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – ज्ञानवर्धिनी विद्यालय ,चाकण, तालुका खेड
प्रशंसनीय 1) 2000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव, तालुका आंबेगाव
प्रशंसनीय 2) 2000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – विद्यानिकेतन, चाकण, तालुका खेड

एकल गायन
1)सर्वोत्कृष्ट 3000/सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र – पार्थ कोकीळ
2)उत्कृष्ट 2000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – मयंक शेगोकर
3)उत्तम 1000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – ईश्वरी धंद्रे
प्रशंसनीय 1) 500/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – अर्णव इंगवले
प्रशंसनीय 2) 500/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – अर्णवी रोडे

एकल वादन
1)सर्वोत्कृष्ट 3000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – महारुद्र राऊत
2)उत्कृष्ट 2,000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – जीवन घोडके
3)उत्तम 1000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – श्रेयस गायकवाड
प्रशंसनीय 1)500/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र -वृषाली बामगुडे
प्रशंसनीय 2) 500/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – प्रेम नानवटे

एकल नृत्य
1)सर्वोत्कृष्ट 3000/सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र – शेवंती कांबळे
2)उत्कृष्ट 2000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – अरण्या जगताप
3)उत्तम 1000/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – अद्विका वाळुंज
प्रशंसनीय 1) 500/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – परिणीती बारवे
प्रशंसनीय 2)500/सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र – स्वराली शेळकंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *